Psalms 61

1हे देवा, माझी आरोळी ऐक;
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन;
माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.
3कारण तू माझ्यासाठी आश्रय,
माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस.

4मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन;

मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली मी आश्रय घेईन.
5कारण हे देवा, तू माझी नवसांची प्रार्थना ऐकली आहेस;
जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे.

6तू राजाचे आयुष्य वाढीव

त्याचे वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.
7मी देवासमोत सर्वकाळ राहो;
तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील.

मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन,

म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.
8

Copyright information for MarULB